Goa Weather: पूर, थंडीची लाट, तापमान! कसे राहिले गोव्याचे हवामान, वाचा..

गोमन्तक डिजिटल टीम

हवामान

यंदा राज्यात नवीन विक्रम झाले. गोव्यात पावसाचाच विचार केल्यास सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात तब्बल ४४०० मिमी म्हणजेच १७३ इंच पावसाची नोंद झाली.

2024 Goa Weather Report

अतिवृष्टी

राज्यात कमी काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यंदा दरड कोसळणे, पूर येणे, झाडे कोसळणे, घरे पडणे अशा अनेक घटनांची नोंद करण्यात आली.

2024 Goa Weather Report

पावसाची नोंद

राज्यात ७ जुलै रोजी २३६ मिमी, १५ जुलै रोजी १६३.६ मिमी आणि १ ऑगस्ट रोजी १३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यातील पाऊस नोव्हेंबर अखेरीपर्यंत सुरूच होता.

2024 Goa Weather Report

थंडीची चाहूल

राज्यात डिसेंबरच्या सुरुवातील थंडीची चाहूल लागली. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात तसेच अधिक काळ थंडी जाणवणार असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत

2024 Goa Weather Report

ग्रामीण भागात अधिक प्रभाव

राज्यात तशी आता सौम्य थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागात हा प्रभाव अधिक जाणवत आहे.

2024 Goa Weather Report

तापमान

परंतु १७ डिसेंबर रोजी राज्यातील किमान तापमानाचा पारा हा १८.५ अंशांवर गेला होता जे मागील पन्नास वर्षांतील सर्वात किमान तापमान होते.

2024 Goa Weather Report

धोक्याचे बदल

राज्यातील हवामान पॅर्टनमध्ये होणारे हे बदल धोक्याचे असून आताच जर योग्य ती पावले उचलली नाहीत तर काळ वैऱ्याचा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

2024 Goa Weather Report
Celebrate Christmas Like Goa