Sameer Amunekar
जिममध्ये न जाता, फक्त दिवसातील २० मिनिटे देऊन तुम्ही स्वतःला फिट आणि स्लिम बनवू शकता. घरच्या घरी करा हे सोपे वर्कआउट!
कोणत्याही व्यायामापूर्वी शरीराचे तापमान वाढवणे गरजेचे आहे. ३-५ मिनिटे जागीच धावणे किंवा जंपिंग जॅक्स करा.
परफेक्ट फिगरसाठी स्क्वॅट्स हा सर्वोत्तम व्यायाम आहे. हे तुमच्या पायांच्या आणि हिप्सच्या स्नायूंना टोन करण्यास मदत करते. १५-२० वेळा ३ सेट करा.
एब्ससाठी प्रभावी पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि कोअर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्लँक हा जालीम उपाय आहे. किमान ३० ते ४५ सेकंद एका स्थितीत स्थिर राहा.
खांदे, छाती आणि हातांचे स्नायू सुडौल करण्यासाठी पुश-अप्स करा. जर सुरुवातीला कठीण वाटत असेल, तर गुडघ्यांवर टेकून करा.
पाय आणि हिप्सच्या शेपसाठी लंगजेस अत्यंत प्रभावी आहेत. दोन्ही पायांनी आलटून-पालटून १२-१२ वेळा करा.
शेवटी २ मिनिटे स्ट्रेचिंग करा. वर्कआउटसोबतच गोड पदार्थ टाळा आणि भरपूर पाणी प्या, यामुळे रिझल्ट लवकर दिसेल!