गोमन्तक डिजिटल टीम
इंडिया बाईक विक (आयबीडब्ल्यू)ची 11वी आवृत्ती ६ आणि ७ डिसेंबर रोजी गोव्यात बागा येथे आयोजित होत आहे.
भारताची मीनाक्षी दास आपल्या ‘द बिग ट्रिप स्टेज’ या कार्यक्रमात दुचाकीवरून केलेल्या 67 देशांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहे.
1982 मध्ये मोटरसायकल वरून जगाची सफर करणारी पहिली महिला ठरलेल्या एलस्पेथ बियर्ड सारख्या साहसी ट्रॅव्हल प्रेमीशी चर्चा आणि संवाद करण्याची संधी लाभणार आहे.
आधुनिक काळात जगाच्या सुंदर कोपऱ्यांचा शोध घेणारा मार्क ट्रॅव्हल्ससारखा ट्रॅव्हल ब्लॉगरही या व्यासपीठावरून भेटीला येणार आहे.
भारतीय बाइकर्स सय्यद ओमेर सिद्दिकी, टागोर चेरी, मोना आणि श्याम या जोडप्यांचे अनुभव ऐकणे ही देखील एक रोमांचक बाब असेल.
महोत्सवात सहभागी झालेल्यांना ओव्हरलँड ट्रिप आयोजक आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांची संवाद साधण्याची संधी लाभेल.
कार्नेट डी पॅसेज राइडिंग लायसन्स आणि आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी बायकर्सना त्यातून मार्गदर्शन मिळू शकेल.