'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट'मीच जिंकणार; आशिया कप संपण्यापूर्वीच पाकिस्तानी बॉलरचे वक्तव्य...

यंदाच्या आशिया कपमध्ये आतापर्यंत घेतल्या सर्वाधिक विकेट्स
haris rauf
haris raufDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup Cricket 2023: आशिया कप संपण्यापूर्वीच एका पाकिस्तानी गोलंदाजाने मोठे वक्तव्य केले आहे. यंदाच्या आशिया चषक 2023 मध्ये मी 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' असेन असे त्याने म्हटले आहे. याच गोलंदाजाच्या नावावर यावर्षी सर्वाधिक विकेट्सही आहेत.

आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 चा पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झाला. पाकिस्तानने हा सामना अगदी सहज जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हरिस रौफने शानदार गोलंदाजी केली. दरम्यान, आशिया कप स्पर्धा संपायला अजून बराच अवकाश आहे.

haris rauf
गोव्यात त्सुनामी? सायरन वाजला अन् सरकारी यंत्रणेची उडाली धांदल; 6 सप्टेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

हारिस रौफने म्हटले आहे की, त्याने बांगलादेशच्या एकूण 4 खेळाडूंना पॅव्हेलियनच्या दिशेने पाठवले. मात्र, हारिस रौफ एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर त्याला याहून मोठे काहीतरी करायचे आहे. यंदाच्या आशिया चषकात त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळवायचा आहे, असे हरिसने सामन्यानंतर सांगितले.

सामन्यानंतर हारिस रौफ म्हणाला, "मी येथे बरेच सामने खेळले आहेत. मी लाहोरमध्ये पाकिस्तान सुपर लीग खेळलो आहे. आमच्या प्रेक्षकांची नेहमीच इच्छा असते की आम्ही येथे चांगली कामगिरी करावी. कोणत्याही खेळापूर्वी आम्ही नियोजन करतो. खेळपट्टीवर चेंडू खेळणे कठीण होते.

हारिस म्हणाला, "मला आज यॉर्कर टाकण्याची गरज नव्हती. मी अशीच मेहनत करेन. मला यंदाच्या आशिया चषकात "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार जिंकायला आवडेल. पुढचा प्रवास कसा असेल ते पाहूया

haris rauf
Karnataka Bus Accident At Goa: चालकाला लागली डुलकी; कर्नाटकची बस आगशीत उलटली...

हरिस रौफने यंदाच्या आशिया कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. हारिस रौफने भारताविरुद्ध ३ बळी घेतले होते. हारिसने अशीच गोलंदाजी करत राहिला तर तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार नक्कीच जिंकेल, अशी अपेक्षा करता येऊ शकते.

कारकिर्द

हारिस रौफने आतापर्यंत पाकिस्तानसाठी 27 एकदिवसीय, 1 कसोटी आणि 62 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 53, 1 आणि 83 बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने एकदा केला आहे.

पुन्हा भारताविरूद्ध लढत

आशिया चषक सुपर 4 मध्ये पाकिस्तान संघाला आपला पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे. प्रेमनंदा स्टेडियमवर 10 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com