T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, या दिग्गज कोचला हटवले!

BCCI: T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अनेक मोठी पावले उचलत आहे.
BCCI
BCCIDainik Gomantak
Published on
Updated on

Board of Control for Cricket in India: T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अनेक मोठी पावले उचलत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आधीच काढून टाकली आहे, तर आता आणखी एक मोठी कारवाई करताना बीसीसीआयने टीम इंडियातील एका अनुभवी कोचला हटवले आहे.

या दिग्गज खेळाडूला टीम इंडियातून डिस्चार्ज देण्यात आला

T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आता पॅडी अप्टन यांच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही. 2022 च्या T20 विश्वचषकासह, पॅडी अप्टन (Paddy Upton) यांचा बीसीसीआयसोबतचा करार संपला आहे.

BCCI
T20 World Cup 2024 साठी ICC ने घेतला मोठा निर्णय, संघांमध्ये केला हा बदल

एकदिवसीय विश्वचषक 2011 चा देखील भाग होता

53 वर्षीय पॅडी अप्टन यांना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या सल्ल्यानुसार टीम इंडियाचे मेंटल कंडीशनिंग कोच बनवण्यात आले. या वर्षी जुलैमध्ये ते टीम इंडियाशी जोडले गेले होते. याआधी, पॅडी अप्टन यांनी 2008-11 च्या कार्यकाळात मेंटल कंडिशनिंग कोच आणि स्ट्रॅटेजिक कोच या दुहेरी भूमिकेत टीम इंडियासोबत काम केले आहे.

BCCI
T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व सेलेक्टर्सची हकालपट्टी

आयपीएलमध्ये द्रविडसोबत काम केले

पॅडी अप्टन यांनी आयपीएलमध्ये राहुल द्रविडसोबत राजस्थान रॉयल्ससाठी काम केले आहे. पॅडी अप्टन यांनी पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्ससह मुख्य कोच म्हणून काम केले आहे, तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com