Australia Beats Tunisia: तब्बल 12 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप स्पर्धेत विजय; ट्युनिशियावर केली मात

1-0 गोलफरकाने विजय; मिशेल ड्युक याने नोंदवला एकमेव गोल
Tunisia vs Australia
Tunisia vs AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

Tunisia vs Australia: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी सातव्या दिवशी ग्रुप डी मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने ट्युनिशियाला 1-0 गोलफरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. दरम्यान, या विजयाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाने तब्बल 12 वर्षानंतर फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवला आहे.

(FIFA Football World Cup 2022)

या पुर्वी ऑस्ट्रेलियाने फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत 2010 मध्ये विजय मिळवला होता, त्यानंतरपासून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपमधील विजयाचा दुष्काळ सुरू झाला होता. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा फुटबॉल वर्ल्डकप खेळत असून आत्तापर्यंत वर्ल्डकपमधील एकुण 17 सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

या सामन्यात 23 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या मिशेल ड्युक याने हेडरद्वारे सुरेख गोल नोंदवला. फर्स्ट हाफमध्ये ऑस्ट्रेलियाची ही आघाडी कायम राहिली. त्यानंतर उत्तरार्धातील खेळातही हीच आघाडी कायम राहिली. संपुर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत ट्युनिशियाने चेंडूवर वर्चस्व राखले. ट्युनिशिच्या खेळाडुंचे पासिंगही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडुंच्या तुलनेत सरस होते.

Tunisia vs Australia
T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, या दिग्गज कोचला हटवले!

हा यंदाच्या वर्ल्डकपमधील 50 वा गोल ठरला. ऑस्ट्रेलियाने गेल्या सामन्यातही पहिला गोल केला होता, पण त्या सामन्यात त्यांना फ्रान्सकडून पराभव स्विकारावा लागला होता. ट्युनिशियाचा या स्पर्धेतील पहिल्या सामना डेन्मार्क विरोधात झाला होता. हा सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला होता. तर ऑस्ट्रेलियाचा फ्रान्सविरोधात 1-4 असा पराभव झाला होता. यापुर्वी दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. ट्युनिशिया फिफा रँकिंगमध्ये 30 व्या तर ऑस्ट्रेलिया 38 व्या स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com