Vastu Tips For New Home: वास्तुदोष टाळण्यासाठी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर करा 'हे' उपाय

वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगितलेले आहेत जे नवीन घरात प्रवेश करताना पाळले पाहिजे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते.
Vastu Tips For New Home
Vastu Tips For New HomeDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips For New Home: वास्तुशास्त्रात घरामध्ये सुख-समृद्धी आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्याने जीवन आनंदी होते. वास्तूमध्ये नवीन घराशी संबंधित काही खास नियम देखील सांगितले आहेत. 

वास्तूनुसार नवीन घरात प्रवेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर वास्तुदोष होतो. त्यामुळे कामात वारंवार अडथळे येत असतात. चला तर मग जाणून घेऊया नवीन घरात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

नवीन घरात प्रवेश करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पिवळे पडदे

नवीन घरात प्रवेश करताना संपूर्ण घरामध्ये पिवळे पडदे लावणे शुभ मानले जाते. हळदीचे पाणी घरभर पसरवावे. यामुळे गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या आशीर्वादाने कुटुंबाची भरभराट होऊ लागते.

तेलाचा दिवा लावावा

जर तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा तुम्ही नवीन घरात गेल्यावर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मोहरीचे तेल दान करावे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावणे देखील फायदेशीर मानले जाते.

स्वस्तिक यंत्र

नवीन घरातील सुख-शांती भंग होत असेल तर स्वस्तिक यंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावे. गणेशमूर्तीची स्थापना मुख्य दरवाजाबाहेर करावी. असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे.

पांढरा तांदूळ किंवा कापूर दान

नवीन घरात वास्तुदोष होणार नाही याची खात्री करण्यासाठी पांढरा तांदूळ किंवा कापूर दान करावा. घराच्या भिंतींना निळा, हिरवा, पांढरा अशा शुभ रंगांनी रंगवावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मनोबल वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा कायम वास करते.     

योग्य दिशा

घर असे असावे की, सकाळी सूर्यप्रकाश मिळेल. घरात अंधार असेल तर ते वास्तुदोषामुळेही असू शकते. यामुळे दुर्दैव आणि आजारपण आणि दुःख यांना सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी रात्री घरभर लाल मसूर पसरवा आणि सकाळी बाहेर फेकून द्यावे.

लाफिंग बुद्धा

नवीन घरात वास्तू दोष निर्मूलन यंत्र लावावे. लाफिंग बुद्ध आणि क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच वास्तुनुसार दररोज मीठाने घर पुसल्याने घराला सुख-समृद्धी लाभते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com