मेष - चुकीचे विचार मनात येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा. प्रवासाची स्थिती निर्माण होऊ शकते. तणाव निर्माण होऊ शकतात.
वृषभ - आजचा दिवस काहीसा ठीक असेल, काही त्रास होऊ शकतो तरीही काळजी घावी. तुमची अधिकाऱ्यांकडून प्रसंशा होईल.
मिथून - तुमच्या जवळच्या माणसांची भेट घ्याल. काहीसा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, फसवणूक होऊ शकते काळजी घ्या.
कर्क - आरोग्याला जपा. गरज असेल अशाच ठिकाणी खर्च करावा. विचार करून प्रश्न वाढवू नका.
सिंह - आजच्या दिवशी वाहने सावकाश चालववती. जमिनीची कामे आज मार्गी लागणार आहेत.
कन्या - धनलाभ होईल परंतु खर्च देखील तेवढाच वाढेल. गरजेच्या ठिकाणीच खर्च करा त्यामुळे कष्ट जाणवणार नाही.
तूळ - आज बोलून गोष्टी सुटणार आहेत, मात्र यासाठी तोंडात साखर ठेऊन वागावं लागेल.
वृश्चिक - अनेक दिवसांपासून घरच्यांना भेटायचं आहे तर ते आज साध्य होईल. आरोग्याला मात्र सांभाळा.
धनु - शत्रूंपासून सावध राहा. हाताखाली काम करण्याऱ्या व्यक्तींकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
मकर - नोकरीतील अडचणी दूर होतील. आरोग्यासंदर्भात झालेले आजार दूर होतील.
कुंभ - कुटुंबातील सदस्यांकडे विशेष लक्ष द्याल.घरच्यांसाठी भरपूर खरेदी कराल.
मीन - वाहने सावकाश चालवावीत. केवळ विचार करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.