म्हापसा: सनबर्न महोत्सवाला कामुर्लीतूनही जोरदार विरोध होऊ लागला असतानाच आमदार मायकल लोबो यांनी कळंगुटचे दरवाजे खुले असल्याचे आज सूचक विधान केले आहे.
मायकल लोबो यांनी माध्यमांशी बोलताना ‘सनबर्न’वर भाष्य केले. ते म्हणाले, सद्यस्थितीत गोव्यात कळंगुट मतदारसंघ सोडल्यास सनबर्नचे कुणीही स्वागत करण्यास इच्छुक नाही, असे चित्र दिसत आहे. यापूर्वी कांदोळीत (Candolim) सनबर्नचे आयोजन झाले आहे. त्यानंतर वागातोर येथे सनबर्न होऊ लागला. या जागा चांगल्या आहेत.
अशावेळी सरकारने जिथे साधनसुविधा व रस्ते आहेत, विशेषतः लोकांकडून स्वागत आहे तिथे सनबर्न करावे. कामुर्लीचे नाव न घेता प्रस्तावित आयोजनस्थळी एकमेव रस्ता असल्यास सनबर्न होऊ शकत नाही. परिणामी तिथे वाहतूक कोंडीची समस्या उदभवेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.