Margao: भाडेकरू पडताळणी मोहिम मडगावात रखडली; झोपडीपट्टी परिसरातील परप्रांतीयांची नोंदच नाही

Margao Tenant Verifications: सरकारने काही भागात शोध मोहीम सुरू केली असली तरी मडगावातील काही भागात झोपड्या भाड्याने घेउन राहणाऱ्या परप्रांतीयांची कोणतीही नोंदणी स्थानिक पोलिस स्थानकात करण्यात आली नाही.
Tenant Verifications in Goa
Margao Tenant VerificationsDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Teanat Verifications

फातोर्डा : भाडेकरूंची शोध घेण्यासाठी पडताळणी मोहीम राबविण्याची घोषणा राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती.

भाडेकरू पडताळणी कायदा राज्यात लागू झाला आहे. या कायद्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकास १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. सरकारने काही भागात शोध मोहीम सुरू केली असली तरी मडगावातील काही भागात झोपड्या भाड्याने घेउन राहणाऱ्या परप्रांतीयांची कोणतीही नोंदणी स्थानिक पोलिस स्थानकात करण्यात आली नाही.

मालभाट येथील आपोलो व्हिक्टर हॉस्पिटलजवळ, खारेबांद, आझादनगरी या भागात अनेक झोपड्या उभारून त्या परप्रांतीयांना भाडेपट्टीवर दिल्या आहेत. मात्र या भाडेकरूंची कोणतीही नोंद स्थानिक पोलिस स्थानकात करण्यात आलेली नाही.

Tenant Verifications in Goa
Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

याचा तपशील पोलिसांनी जाहीरही केलेला नाही.या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. याबाबत नगरसेवक महेश आमोणकर यांनी सांगितले की, या प्रकरणी आपण दक्षता घेतली आहे. हा विषय स्थानिक प्रशासनाकडे मांडलेला आहे, मात्र त्‍याची अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com