Goa News : मुरगाव बंदरावर लाखो टन बॉक्साईट खनिज अडून ! कंपन्या कात्रीत

Goa News : माल गोव्याबाहेर नेण्याचा प्रयत्न
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News : वास्को,मुरगाव बंदरावर साठवून असलेली खनिजाची वाहतूक सध्‍या होत नसल्‍याचे दिसून आले असून त्‍यामुळे तब्‍बल २.८ लाख टन बॉक्‍साईड या बंदरावर मागचे दहा दिवस पडून आहे.

स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांच्‍या हस्तक्षेपामुळेच ही मालवाहतूक अडली आहे, असा आरोप होऊ लागला आहे. या कथित अडवणुकीमुळे अनेक कंपन्या अडचणीत आल्‍या असून त्‍यांनी खनिज हाताळणीसाठी गोव्याबाहेरच्या बंदरांकडे हलवण्यासाठी हालचाली चालवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सध्‍या बंदरावर आदित्‍य बिर्ला समूहाकडून दक्षिण आफ्रिकेतून आणलेले २.८ लाख टन बाॅक्‍साईट अडकून पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरगाव बंदर प्राधिकरण बंदरात हे बॉक्साईट खनिज १० दिवसांपेक्षा अधिक काळ पडून आहे. त्यामुळे कंपनीला १५ कोटींचा आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे.

Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

आदित्य बिर्ला समुहासह भागधारकांनी अलीकडेच बंदर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की बंदरात स्टीव्हडोर, वाहतूकदार आणि आयातदारांसाठी व्यवसायाचा खर्च वाढला आहे. हे सर्व आमदार आमोणकर यांच्या राजकीय अडवणुकीमुळे झाले आहे, असा आरोप करण्‍यात आला आहे. २.८ लाख टन बॉक्साईट बेळगाव येथील हिंडाल्को प्लांटमध्ये बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या फर्मला धमक्या दिल्यानंतर १० दिवसांपासून बंदरात अडकले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आदित्य बिर्ला समूहाच्या हिंडाल्को या कंपनीने चार्टर्ड केलेल्या दोन जहाजांवर बॉक्साईट आले होते. या वाहतुकीला अधिकृत परवानगी मिळाली असतानाही हा बॉक्साईट माल १० दिवस हलवला नाही.

वाहतूकदार स्थानिक आमदार आमोणकर यांच्या हस्तक्षेपाबद्दल तक्रार करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, प्रतिक्रियेसाठी आमदार संकल्प आमोणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही.

सध्‍या मुरगाव शहरात वाहतूकदारांना अक्षरश: वेठीस धरण्‍याचे प्रकार सुरू झाले आहेत. कोळसा असो किंवा बॉक्‍साईट, या मालाच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ‘प्रोटेक्‍शन मनी’ द्यावा लागतो, असे सांगण्‍यात येते.

साधे घर बांधण्‍यासाठी चिरे आणि रेती वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनाही ट्रीपमागे हजार रुपये ‘प्रोटेक्‍शन मनी’ द्यावा लागतो. याची माहिती पोलिस आणि इतर यंत्रणांना आहे. पण राजकीय दडपणामुळे या यंत्रणाही मुक्‍या व बहिऱ्यांसारख्‍या वागतात. हे सर्व अवैध धंदे स्‍थानिक लोकप्रतिनिधीच्‍या आशीर्वादानेच चालताहेत.

-कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस, मुरगावचे काँग्रेस नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com