Margao: मडगाव पार्किंग प्रकल्प जागेत ‘रेंट अ कार’ वाहनांचा कब्जा; पालिकेकडे कारवाईची मागणी

Margao Parking Project: मडगावातील बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारण्याचे पालिकेचे प्रयत्न अजूनही फळाला आलेले नाहीत. तरीही येथील खुल्या जागेत ‘रेंट अ कार’ आणि अन्य खासगी वाहने पार्क केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही.
Margao Parking Project
Pay ParkingDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Parking Project

मडगाव: मडगावातील पालिका इमारतीमागील जागेत बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारण्याचे पालिकेचे प्रयत्न अजूनही फळाला आलेले नाहीत. तरीही येथील खुल्या जागेत ‘रेंट अ कार’ आणि अन्य खासगी वाहने पार्क केली जात असल्याने पालिकेची तसेच पालिका कर्मचाऱ्यांची वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही.

यासंदर्भात नगरसेवक महेश आमोणकर यांनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर तसेच पालिका अभियंता दीपक फळदेसाई यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. ही वाहने येथे पार्क करू न देता आवश्यक अधिकारिणीकडे तक्रार दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे. शुक्रवारी सकाळी नगरसेवक आमोणकर यांनी या प्रकाराबद्दल नगराध्यक्ष आणि पालिका अभियंत्यांकडे आक्षेप नोंदविला.

या जागेत ‘रेंट अ कार’ आणि खासगी वाहने पार्क करतात, तसेच पालिकेचे अभियंते आणि अन्य अधिकारी पालिकेसमोर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे नगरसेवकांना आपली वाहने पार्क करण्यास जागा मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

अनेक ‘रेंट अ कार’ येथील जागेत पार्क केल्या जात असताना पालिका का कारवाई करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करून आरटीओकडे आवश्यक तक्रार करण्याची सूचना केली. त्यावर पालिका अभियंता फळदेसाई यांनी मार्केट निरीक्षक महेश गावकर यांना तपासणी करून संबंधित अधिकारणीकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमोणकर यांनी दिली.

Margao Parking Project
Cash For Job: 'मी सरकारी जॉब मिळवून देईन असे म्हणाला आणि..', माजी सरपंचाने सांगितले 'माणिकराव'चे कारनामे

पालिका इमारतीमागील जागेत बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारला जात नाही म्हणून ‘रेंट अ कार’ व खासगी वाहने तेथे उभी करून ठेवली जात आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी व त्या जागेत बहुमजली पार्किंग प्रकल्प लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असे नगरसेवक महेश आमोणकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com