
MLA Pravin Arlekar पेडणे मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर वारंवार सांगत असून याचा प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा न्हयबाग येथे आणून दिला. न्हयबाग -पोरास्कडे येथील एका जीर्ण शासकीय जिमचा आर्लेकरांनी मेकओव्हर केलाय.
जिमसाठी आवश्यक ते सर्व साहित्य पुरवत नूतनीकरण केलेल्या जिमचे आर्लेकरांनी नुकतेच उद्घाटन केलंय. याप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत जिमचा वापर करणारा युवा वर्ग, जिमचे सदस्य उपस्थित होते.
आयुष्य जगत असताना आरोग्याकडे लक्ष हवं. नियमित व्यायाम करून तब्येत चांगली ठेवा. तसेच या परिसरात असलेल्या सर्वांनी या जिमचा पुरेपूर वापर करावा असेही त्यांनी उद्दघाटन प्रसंगी सांगितले.
पावसाळ्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे हॉटमिक्स पद्धतीने बुजवण्यात येतील. तसेच भूमिगत वीज जोडणीच्या कामाला गती देण्यात येईल, त्यामुळे मतदार संघातील विजेची समस्या सुटण्यास मदत होईल, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
आर्लेकर पुढे म्हणाले की, आपल्या प्रभागातील विकासकामे दर्जेदार व्हावीत याकडे नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याची निगा राखणे आवश्यक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.