गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

Goa IFFI 2024: गोवा मनोरंजन सोसायटीने यंदा ‘इफ्फी’त गोमंतकीय संस्कृती दिसावी, येथे येणाऱ्या चित्रपट रसिकांना येथील संस्कृतीची, कलेबाबत माहिती मिळावी यासाठी आकाशकंदील स्पर्धा तसेच शिगमा आणि कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आले.
IFFI 2024
IFFI 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa IFFI 2024

गोवा मनोरंजन सोसायटीने यंदा ‘इफ्फी’त गोमंतकीय संस्कृती दिसावी, येथे येणाऱ्या चित्रपट रसिकांना येथील संस्कृतीची, कलेबाबत माहिती मिळावी यासाठी आकाशकंदील स्पर्धा तसेच शिगमा आणि कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आले.

या परेडमध्ये सहभागी झालेले चित्ररथ देखील आकर्षणाचे केंद्र ठरले. या दोन्ही उपक्रमांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिगमो आणि कार्निव्हलच्या नृत्याच्या तालावर अनेक इफ्फीचे प्रतिनिधी थिरकताना दिसले.

आकाशकंदील स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील कलाकारांचे आकाशकंदील दाखल झाले होते. टाकाऊपासून टिकाऊ, विविध संकल्पना असलेले आणि कलात्मक आकर्षक आकाशकंदील अनेकांचे मन वेधत होते. पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची वारी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या मूर्ती असलेले आकाशकंदील वारी परंपरा अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त होत होती.

करवंटीपासून बनविलेला आकाशकंदील अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. संपूर्णतः करवंटी आणि करवंटीचा भुसा वापरून केलेला कंदील त्यांच्या मध्यभागी असलेले शिवलिंग आणि प्रकाश अतिशय मोहक वाटत होता तसेच कुतूलहाचे कारण बनत होता. अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेले हे आकाशकंदील पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

IFFI 2024
Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

बाहुबली चित्ररथ लक्षवेधी

शिमगा आणि कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आल्याने दुपारी ३ वाजल्यापासून पणजीतील मुख्य रस्त्यावर गर्दी झाली . या परेडमध्ये विविध पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. परंतु इफ्फीत बाहुबली चित्रपटांवर आधारित साकारलेला चित्ररथ अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com