Vinoo Mankad Trophy: कर्णधार पुंडलिक गोव्याच्या विजयाचा शिल्पकार

कमी धावसंख्येच्या लढतीत सौराष्ट्रला तीन विकेटने नमविले
U-19 Cricket Team Goa Captain Pundalik Naik
U-19 Cricket Team Goa Captain Pundalik NaikDainik Gomantak
Published on
Updated on

U-19 Vinoo Mankad Trophy: कर्णधार पुंडलिक नाईक याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नोंदविलेल्या आक्रमक नाबाद ४६ धावांमुळे गोव्याने विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय नोंदविला. कमी धावसंख्येच्या सामन्यात सौराष्ट्रवर तीन विकेट राखून नमविले.

स्पर्धेच्या ड गटातील सामना शनिवारी पुदुचेरी येथे झाला. पावसामुळे सामना प्रत्येकी ३६ षटकांचा करण्यात आला. गोव्याचा मध्यमगती स्वप्नील गावकर (४-३३) व ऑफस्पिनर यश कसवणकर (३-१४) यांनी सौराष्ट्राचा डाव १२२ धावांत गुंडाळला.

U-19 Cricket Team Goa Captain Pundalik Naik
37th National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या टॉर्च रॅलीसाठी नीरज चोप्राची उपस्थिती

नंतर १ बाद ४६ वरुन गोव्याचीही घसरगुंडी उडाली. १० धावांत ५ विकेट गमावल्यामुळे डाव ६ बाद ५६ असा गडगडला. पुंडलिकने दिशांक मिस्कीन (२२) याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करून गोव्याला सावरले.

नंतर संघाला शेवटचे तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. पुंडलिक ४६ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३९ चेंडूंत दोन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४६ धावा केल्या.

गोव्याचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांनी अरुणाचल प्रदेशला १२४ धावांनी हरविले होते. पुढील सामना सोमवारी (ता. १६) राजस्थानविरुद्ध खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र : ३२.२ षटकांत सर्वबाद १२२ (जैनाम २३, अंश गोसाई २०, तिर्थकजसिंह जडेजा नाबाद २३, पुंडलिक नाईक ५.२-०२४-१, युवराज सिंग ५-०-२५-१, स्वप्नील गावकर ८-०-३३-४, शिवांक देसाई ७-०-२५-१, यश कसवणकर ७-१-१४-३) पराभूत

वि. गोवा: ३५.३ षटकांत ७ बाद १२७ (वीर यादव ८, शंतनू नेवगी २६, मल्हार नाईक ११, यश कसवणकर २, दिशांक मिस्कीन २२, जीवनकुमार चित्तेम ५, वर्धन मिस्कीन ०, पुंडलिक नाईक नाबाद ४६, युवराज सिंग नाबाद ५, मार्विन जाविया २-२५, अंश गोसाई २-१४).

U-19 Cricket Team Goa Captain Pundalik Naik
Goa Politics: खंवटे - लोबोंमधील दरी कायम; पर्वरीत एका व्यासपीठावर येणे टाळले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com