मुख्यमंत्र्यांचा निर्णय 'योग्य'! अभियंत्यांवरच्या कारवाई निर्णयावरून नागरिक समाधानी; पंप ऑपरेटर्सवरही लक्ष देण्याची मागणी

Goa News: रस्त्यांची कामे केली जातात; पण ती किती टक्के व्यवस्थित केली गेली याची कंत्राटदार, अभियंते यांना माहिती आहे की नाही हेच कळत नाही, अशी शंकाही वाहनचालक व इतर लोक व्यक्त करीत आहेत
Goa News: रस्त्यांची कामे केली जातात; पण ती किती टक्के व्यवस्थित केली गेली याची कंत्राटदार, अभियंते यांना माहिती आहे की नाही हेच कळत नाही, अशी शंकाही वाहनचालक व इतर लोक व्यक्त करीत आहेत
Bad Roads In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अकार्यक्षम अभियंत्यांवर कडक कारवाई करून त्यांच्या खर्चातूनच खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करून घेणार असल्याचा इशारा दिला आहे. हे करणे आज अत्यंत गरजेचे असल्याचे मत वाहनचालक, सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग यांचे असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकार, नगरपालिका, पंचायत हे आपल्या मतदारसंघातील, पालिका क्षेत्रातील व पंचायत परिसरातील रस्त्याच्या निविदा काढतात आणि त्या स्वीकारण्यासाठी संबंधित खात्याचे अभियंते त्याचप्रमाणे इतर कंत्राटदार ते काम हाती घेतात. रस्त्यांची कामे केली जातात; पण ती किती टक्के व्यवस्थित केली गेली याची कंत्राटदार, अभियंते यांना माहिती आहे की नाही हेच कळत नाही, अशी शंकाही वाहनचालक व इतर लोक व्यक्त करीत आहेत.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घरजावई होऊन बसलेल्या अभियंत्यांची इतरत्र उचलबांगडी केली जाणार असल्याचे म्हटलेले आहे. ते योग्य असून सरकारातील कोणत्याच मंत्री व आमदाराने आपल्या जवळच्या अभियंत्याबाबत बदली करताना ढवळाढवळ केल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ऐकू नये, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Goa News: रस्त्यांची कामे केली जातात; पण ती किती टक्के व्यवस्थित केली गेली याची कंत्राटदार, अभियंते यांना माहिती आहे की नाही हेच कळत नाही, अशी शंकाही वाहनचालक व इतर लोक व्यक्त करीत आहेत
गोवा मुक्तीनंतर प्रथमच उजळला 'हा' रस्ता! इतकी वर्षे होते अंधाराचे साम्राज्य

पंप ऑपरेटर्सवरही मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रथम अभिनंदन करतो. त्यांनी आता जे पंप ऑपरेटर्स २० ते २५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी. लोकांना पाणी न देता हॉटेल व्यावसायिकांना ते देण्यात येते. काही पंप ऑपरेटरनी कोट्यवधी रुपयांचे बंगले बांधले, लाखो रुपये किमतीचे गाड्या घेतल्या आहेत. असा भ्रष्टाचार करून पैसे मिळविले त्या पंप ऑपरेटरना अद्दल ही घडलीच पाहिजे, असे म्हापसा युथ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर यांनी सांगितले.

रस्ते हॉटमिक्स केले जातात; परंतु ते महिन्याच्या आत वाहून जातात. अनेक कंत्राटदार सांगतात की, आम्हाला रस्त्यांचे कंत्राट घेतल्यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून टक्केवारी विचारली जाते. मग आम्हाला कंत्राटरूपाने काम स्वीकारावे लागते. त्यात खात्याचा, पालिका किंवा पंचायतीचा वाटा काढावा लागतो आणि यातून आमचा फायदा काढून शिल्लक रक्कम राहते त्यातून काम करावे लागते, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

संजय बर्डे, बोडगेश्वर शेतकरी संघ, अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com