Goa Drishti Marine: दृष्टी मरीनने समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्यांना दिला 'हा' सल्ला

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभुमीवर दिशानिर्देश
Goa Drishti Lifeguard
Goa Drishti LifeguardDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drishti Marine: भारतीय हवामान खात्याने (IMD) गोव्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आता गोव्यातील राज्य-नियुक्त व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी, दृष्टी मरीनने देखील समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यातून गोव्यातील वाढते तापमान आणि हीट वेव्हच्या दृष्टीने हवामानविषयक सल्ला दिला आहे.

Goa Drishti Lifeguard
Kadamba Transport: गोव्यातील खासगी बस सेवेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री...

यंदाच्या मार्चमध्ये गोव्यातील तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, 1 मार्चपासून आतापर्यंत कमाल तापमान सतत 36 अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे. सरासरी तापमानापेक्षा हे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने जास्त आहे.

उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी स्थानिकांसह पर्यटक समुद्र किनाऱ्यावर येत असतात. त्या पार्श्वभुमीवर दृष्टी मरिनने हा सल्ला दिला आहे. त्यानुसार सूर्याच्या थेट उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवावे, त्यासाठी भरपूर पाणी प्यावे. सनबर्न आणि उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन सोबत बाळगावे.

कडक उन्हात निळा समुद्र आकर्षित करत असतो पण शांत वाटणाऱ्या लाटांमध्ये रिप करंट, फ्लॅश करंट आणि पाण्याखालील प्रवाह असू शकतात. त्यामुळे समुद्रात डुबकी मारण्यापुर्वी सावधगिरी बाळगावी.

Goa Drishti Lifeguard
Goa Forest Fire : म्हादई अभयारण्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राकडून मदत : विश्वजित राणे

किनार्‍यावर उपस्थित असलेल्या जीवरक्षकांची टीम सभोवतालचे निरीक्षण करत असते आणि हे जीवरक्षक प्रशिक्षित आहेत.

सूर्यकिरणे तीव्र असतात तेव्हा दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. दृष्टीचे 450 जीवरक्षक आहेत. दृष्टीने लाल आणि पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेल्या ध्वजांमध्ये पोहण्याचा सल्ला दिला जातो.

गोव्यात 35 लाईफसेव्हर टॉवर आहेत. समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुखापत झाल्यास जीवरक्षकाकडे जावे. प्रत्येक जीवरक्षक टॉवर प्रथमोपचार किटने सुसज्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com