मरावे परी देहरूपी उरावे! गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक भैय्या देसाई यांचे निधन, देह गोमेकॉला दान

Freedom Fighter Bhaiyyasaheb Desai: गोवा मुक्ती लढ्यात भैय्या देसाई यांचे मोठे योगदान; तेरेखोल किल्ल्यावरील सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता
Freedom Fighter Bhaiyyasaheb Desai: गोवा मुक्ती लढ्यात भैय्या देसाई यांचे मोठे योगदान; तेरेखोल किल्ल्यावरील सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता
Bhaiyyasaheb DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा/पेडणे : ‘मरावे पर्री कीर्तीरूपी उरावे’ या संतवचनाप्रमाणे सध्या ‘मरावे परी देहरूपी उरावे’ ही उक्ती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाज कार्यकर्ते, दीनदुबळ्यांचे कैवारी, मराठी भाषा व संस्कृतीचे खंदे समर्थक, विश्वास उर्फ भैय्या देसाई यांनी आचरणात आणली.

भैय्यासाहेबांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. भैयासाहेबांनी आपला देह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा देह गोमेकॉला मंगळवारी सायंकाळी सुपूर्द करण्यात आला.

पेडणे तालुक्याचे भूषण भैय्यासाहेब देसाई यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२ वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पर्वरी येथे दुपारी ठेवले होते. ते मूळ बंदिरवाडा-तुये गावचे. मात्र, पर्वरी येथे मुलीच्या घरी वास्तव्यास होते.

गोवा मुक्ती लढ्यात भैय्या देसाई यांचे मोठे योगदान आहे. तेरेखोल किल्ल्यावरील सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

गोवा मुक्तीनंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठी भाषेचा त्यांना अभिमान होता. ते वेळोवेळी मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात उघडपणे मत व्यक्त करायचे. भैय्या देसाई यांच्या निधनामुळे गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेने दुःख व्यक्त केले आहे.

Freedom Fighter Bhaiyyasaheb Desai: गोवा मुक्ती लढ्यात भैय्या देसाई यांचे मोठे योगदान; तेरेखोल किल्ल्यावरील सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता
180 दिवसांत नेहरु स्टेडीयम उभारणारे गोव्याचे माजी क्रीडा मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त

देहदान करण्यापूर्वी त्यांचे पार्थिव पर्वरी येथे अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अखेरचे शब्द

त्यांची वाचा गेली होती. त्यापूर्वी त्यांनी पाचवेळा ‘भारतमाता की जय’ असा जयघोष करून मातृभूमीला वंदन केले होते. वाचा जाण्यापूर्वी हे भैय्यासाहेबांचे अखेरचे शब्द होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com