
वास्को: वास्को मांगोरहील - वरुणापुरी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य वळणाच्या बाजूस, भारतीय नौदलाने बेकायदेशीररित्या महामार्गाला जोडून केलेल्या सुशोभिकरणावर अद्याप संबंधीत विभागाने कारवाई केली नाही. या नौदलाच्या सुशोभिकरणामुळे महामार्गाच्या वळणावर अपघात होण्याची शक्यता आहे.
( Demanding action on beautification at Vasco - Varunapuri )
वास्को मांगोरहील - वरुणापुरी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय नौदलाच्या 'खलाशी निवासी क्षेत्राच्या 'मुख्य प्रवेशाजवळ नौदलाने महामार्गाजवळ सुशोभिकरण केले आहे. वास्को गांधीनगर ते बायणा - सडा मुरगावपर्यन्तच्या राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलाच्या लोकार्पणावेळी प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते - महामार्ग मंत्री नितीन गडकरी आले असता, त्यांनी नौदलाच्या सुशोभिकरणावर प्रश्न उपस्थित केला होता.
उद्घाटनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला भारतीय नौदलाच्या सुशोभिकरणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र नऊ महीने उलटून गेले तरी नौदलाच्या बेकायदेशीर सुशोभिकरणावर संबंधीत एकाही विभागाने कारवाई केली नाही. यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय नौदलाने दाबोळी, वास्कोमार्गे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही नौदलाला कारणे दाखवा नोटीस किंवा बेकायदेशीर केलेल्या कामावर कारवाई केलेली नाही.
गोवा सरकारच्या नियमांचे उल्लंघन केंद्रीय आस्थापने करीत आलेले आहे. नियम सर्वांना एक सारखे असावे, यासाठी वरुणापुरी वळणाजवळील नौदलाच्या सुशोभिकरणावर कारवाई करणे आवश्यक आहे अशी मगणी होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.