Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी दीपश्रीला फोंडा कोर्टाचा दणका; सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी!

Deepashree Sawant Gavas 4 Day Police Custody: कॅश फॉर जॉब प्रकरणी दीपश्री सावंत गावस हिला फोंडा न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने दीपश्रीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी दीपश्रीला फोंडा कोर्टाचा दणका; सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी!
Deepashree Sawant Gavas Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. रोज नव-नवे खुलासे होत आहेत. पूजा नाईक, दीपश्री सावंत गावस, दिव्या यादव या महिलांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला आहे. यातच आज (12 नोव्हेंबर) दीपश्रीला पोलिसांनी फोंडा न्यायालयात हजर केले होते. न्यायलयाने दीपश्रीला मोठा दणका दिला. न्यायालयाने पुन्हा एकदा दीपश्रीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कोट्यवधींची माया

सरकारी नोकरीसाठी अनेकांना लाखो रुपयांना टोपी घालणाऱ्या दीपश्रीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. दीपश्रीच्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची पाळेमुळे डिचोलीपर्यंत पोहोचली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वस्तुत: दीपश्रीच्या विरोधात डिचोलीतून अद्याप फसवणुकीची तक्रार दाखल झाली नसली, तरी दीपश्रीचे डिचोलीशी असलेले संबंध आणि यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता, ही शक्यता नाकारताही येत नाहीये.

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी दीपश्रीला फोंडा कोर्टाचा दणका; सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी!
Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

दोन वर्षांपूर्वी दीपश्रीला एका फसवणूक प्रकरणात डिचोली पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटका होण्यापूर्वी तिने एक रात्र पोलिस कोठडीची हवाही खाल्ली होती. डिचोली तालुक्यातील सर्वण हे दीपश्रीचे माहेर असले, तरी प्रेमविवाह झाल्यानंतर तिचे माहेरशी संबंध काहीसे दुरावले होते. मात्र, अधूनमधून ती डिचोलीत येत होती, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com