Amazing Goa 2024: 'अमेझिंग गोवा'चा समारोप! चार विश्‍वविक्रमांची नोंद; 'नवकल्पनांचे पॉवरहाऊस' होणार असल्याचा मंत्री गुदिन्होंचा दावा

Mauvin Godinho: भविष्यातील स्टार्टअप्स, उद्योगपतींसाठी ‘अमेझिंग गोवा’ ही परिषद एक आश्रयदाता ठरत आहे, गोव्याला पुढे नेत आहे. या वातावरणामुळे पुढे नवकल्पनांचे पॉवरहाऊस म्हणून गोव्याकडे पाहिले जाईल, असे मत उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.
Amazing Goa 2024
Amazing Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Amazing Goa 2024 Closing Ceremony

पणजी: भविष्यातील स्टार्टअप्स, उद्योगपतींसाठी ‘अमेझिंग गोवा’ ही परिषद एक आश्रयदाता ठरत आहे, गोव्याला पुढे नेत आहे. या वातावरणामुळे पुढे नवकल्पनांचे पॉवरहाऊस म्हणून गोव्याकडे पाहिले जाईल, असे मत उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये भरलेल्या तीन दिवसीय ‘अमेझिंग गोवा’ या व्यावसायिक परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय माजी नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, ‘व्हायब्रंट गोवा फाऊंडेशन’चे नितीन कुंकळयेकर, राजकुमार कामत,‘अमेझिंग गोवा’ जागतिक व्यावसायिक परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा, ‘व्हायब्रंट गोवा’ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष मनोज पाटील, रसिक नाईक, अजय ग्रामोपाध्ये, गौतम खरंगटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरेश प्रभू म्हणाले, तीन दिवसांच्या या परिषदेमुळे अनेकजण एकमेकांना जोडले गेले आणि तो कार्यक्रमाचा समारोप झाल्यास अनेकांसाठी तो कटू अनुभव असतो. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जोडले गेलेले बरेच लोक या मताशी सहमत असतील. येथे निर्माण झालेले नाते निःसंशयपणे फलदायी ठरले, अशी आपणास खात्री आहे.

त्याशिवाय पुढच्या आवृत्तीत, आम्ही या शिखर परिषदेने उभारलेले प्रकल्प अभिमानाने सादर करू. चार जागतिक विक्रम मोडणे प्रभावी होते, असेही त्यांनी नमूद केले. व्यवसाय संमेलने चिरस्थायी नातेसंबंधांची सुरुवात करतात. या शिखर परिषदेने खरोखरच गोव्याला जागतिक संधींचे प्रवेशद्वार होण्याच्या आपल्या वचनाला पूर्ण केले आहे. हे ज्ञान देवाणघेवाण, व्यवसाय जोडणी आणि धोरण चर्चांसाठी एक आदर्श व्यासपीठ प्रदान करते.

परिषदेत चार विश्‍वविक्रम

या परिषदेत चार जागतिक विक्रम प्रस्थापित झाले. त्यात डॉ. स्नेहा भागवत यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षण केंद्रातर्फे १०० मीटरपेक्षा जास्त लांबीची कुणबी साडी तयार केली, ४८ हून अधिक राष्ट्रांसह डेल्टीन जहाजावरील मजेदार खेळ पार पडला, २२ सदस्यांनी १०.५ तासांत लाकडी घर उभारले (सीझर फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील वुडन होम्स इंडिया) आणि डॉ. टीना डायस यांचा एका दिवसात २१ राष्ट्रांसाठी आयुर्वेदिक सल्ला. यांचा यात समावेश होता.

‘अमेझिंग गोवा’ समिटला भेट देणाऱ्यांना पर्वणी

ताळगाव येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२४ चा रविवारी समारोप समारंभ झाला असून या समिटला भेट दिलेल्यांना त्यांचा फोटो आता स्वतःच्या मोबाईलवर मिळवता येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना आणि त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी छायाचित्रांद्वारे त्यांचे क्षण पुनर्जीवित करण्यासाठी छायाचित्रे काढण्यात आले आहेत. हजारोंच्या संख्येने ही छायाचित्रे असल्याने स्वतःचे छायाचित्र मिळविण्याचा एक सोयीस्कर उपाय डॉ. वरद करमली यांनी उपलब्ध केला आहे. त्यासाठी फक्त ‘क्युआर कोड’ स्कॅन करावा लागेल.

Amazing Goa 2024
Amazing Goa: गोव्यातील 23 औद्योगिक क्षेत्रांत गुंतवणुकीची मोठी संधी; जागतिक परिषदेत सरकारने मांडला प्लान

कार्यक्रमाची छायाचित्रे पुन्हा प्राप्त करणे सुलभ करण्यासाठी एक समर्पित ‘क्युआर कोड’ तयार केला आहे. हा कोड स्कॅन करून, सहभागी छायाचित्रे मिळवू शकतात. एका सेकंदात, त्यांना १२ फोटोग्राफर्सनी टिपलेली त्यांची वैयक्तिक छायाचित्रे स्कॅन करणाऱ्या (अमेझिंग गोवा समिटमध्ये उपस्थित) प्रत्येकाला प्राप्त होतील.

कार्यक्रमात हजारांहून अधिक छायाचित्रे काढली गेली आहेत. या प्रतिमा मौल्यवान स्मृतिचिन्ह आणि कार्यक्रमाच्या यशासाठीचे प्रमाण आहेत. अमेझिंग गोवा ने उद्योग क्षेत्रातील धुरीणांना वैचारिक देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ प्रदान केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com