
वास्को: नगर नियोजन खात्याच्या कामकाजात वेग यावा याकरता नोटरी आर्किटेक व नोटरी अभियंते मिळून सहा जणांची नियुक्ती करण्यात आली असून, यात वास्कोस्तीत भरत कामत यांची राज्य सरकारने नोटरी अभियंता म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती स्वतः भरत कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.
(Bharat Kamat from Vasco appointed as Notary Engineer by Government of Goa)
नियुक्ती तांत्रिकी क्लियरन्स विकास कामे तसेच काम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन ऑर्डर देण्याचे अधिकार या नोटरींना देण्यात आले असल्याचे कामात यांनी सांगितले. तसेच या खात्याकडे येणाऱ्या फाईल्स जलद गतीने निकालात काढण्याचा उद्देश आहे. तसेच प्रकल्प रखडू नयेत यासाठी कामाला गती देण्याचे निर्देश नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले असल्याचे सांगितले.
सुधारित ओडीपी तयार करण्यासाठी जे निर्देश आधी दिलेले आहेत. तसेच सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असे अधिकाऱ्यांना बजावण्यात आले असल्याचे कामत यांनी सांगितले. नियुक्त केलेले नोटरी आर्किटेक्ट व नोटरी अभियंत्यांना 500 चौरस मीटर पेक्षा कमी भूखंडाच्या बाबतीत तसेच इतर दस्तऐवजांचे खात्यामार्फत स्वतःच प्रामाणिकरण करण्याचा अधिकार असल्यास असल्याचे ते म्हणाले.
नोटरी कमी जोखीमेची इमारत म्हणजे कमाल 500 चौरस मीटर बांधलेले क्षेत्रफळ असलेली इमारत आणि इमारतीची उंची केवळ 500 चौरस मीटर पर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाच्या संदर्भात गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम विनिमय आणि अंमलात असलेल्या योजनेतील झोनिंग वर्गीकरणाच्या तरतुदीनुसार स्व- प्रमाण आणि तृतीय पक्ष प्रमाणपत्र जारी करण्याच्या योजनांची छाननी काटेकोरपणे केल्यानंतरच नोटरी कडून मंजुरी देण्यात येणार असल्याचे कामात यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.