Crime
CrimeDainik Gomantak

Sanquelim : उत्तर प्रदेश टूर पॅकेजचा बनाव; साखळीतील एकाला दोन लाखाचा गंडा

मुंबई येथील टूर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा नोंद

राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर साखळी येथील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश टूरचे पॅकेज देण्याचा बनाव करत 2.14 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई येथील एका टूर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(A person from Sanquelim was duped for 2 .5 lakh by claiming to provide tour packages to Uttar Pradesh)

Crime
Ponda : बेपर्वाईचा आणखी एक बळी; सेफ्टी टॅंकमध्ये विजेच्या धक्क्याने 19 वर्षीय युवक ठार

मिळालेल्या माहितीनुसार साखळी येथील एका व्यक्तीला ( नाव समजू शकलेले नाही ) उत्तरप्रदेश टूरचे पॅकेज देतो अशी बतावणी करुन मुंबई येथील एका टूर ऑपरेटरने 2.14 लाख रुपये घेतले. यानंतर बराच कालावधी गेला, तरी संबंधीत ऑपरेटर तक्रारदाराला अधिकची माहिती देण्यास टाळाटाळ करु लागला. यावर तक्रारदाराने दिलेले पैसे परत कर म्हटल्यानंतर आरोपीने तक्रारदाराला अर्वाच्च भाषेत उत्तर देत धमकी दिल्याचाा आरोप तक्रारदाराने केला आहे. याबाबत गुन्हा नोंद झाला असून पोलिस अधिक तपास सुरु आहे.

Crime
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

दरम्यान दोन दिवसांपुर्वी फवसणूकीचा गुन्हा घडला असून यामध्ये पणजी शहरात एस्कॉर्ट सेवा देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशामधील एका पर्यटकाकडून 40 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. पर्यटकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पणजी पोलिसांत तक्रार नोंद केली. यानंतर पणजी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पणजी पोलीस अधिक तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com