
दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी असलेल्या सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हॅलोवीन फेस्टीवलच्या कार्यकमात ही घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गर्दीतल्या 50 जणांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण कोरियातील (South Korea) सेयूलमध्ये चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. करोनाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीनं नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॅलोवीन फेस्टिवल ज्या ठिकाणी आयोजित केला जाणार होता तिथं एक लाख लोक जमल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) हॅलोवीन फेस्टिवलच्या (Halloween Party) गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओतून (Video) काही लोक मोठी गर्दी जमल्यामुळ चक्कर येऊन पडत असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोक हॅलोवीन फेस्टिवल साजरा करण्यासाठी जमले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.