न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आर्डर्न (New Zealand PM Jacinda Ardern) यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपणार होता मात्र, मुदतपूर्व राजीनामा देऊन त्याने सर्वांनाच चकित केलं आहे.
आर्डर्न यांची 2017 मध्ये पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यावेळी त्या अवघ्या 37 वर्षाच्या होत्या.
'काम पूर्ण करण्यासाठी माझ्याकडं पुरेशी ऊर्जा शिल्लक नाहीये. राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे.' असे गुरुवारी आयोजित केलेल्या पक्षाच्या वार्षिक कॉकस बैठकीत आर्डर्न म्हणाल्या.
जॅसिंडा आर्डर्न जगातील प्रभावशाली महिला म्हणून देखील नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
जॅसिंडा आर्डर्न यांचा जन्म 26 जुलै 1980 रोजी न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे झाला. आर्डर्न यांना नेहमीच राजकारणाची आवड होती. यामुळे त्यांनी 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्या वयाच्या 37 व्या वर्षी न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या होत्या.
दरम्यान, सात फेब्रुवारी पूर्वी आपण राजीनामा देणार असल्याचेही आर्डर्न यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.