सतत संशय घेणाऱ्या लिव्ह-इन पार्टनरला महिलेने भोकसले

बेंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून हताश झालेल्या रेणुकाने जावेदचा भोसकून खून केला.
Woman murdered her live-in partner
Woman murdered her live-in partnerDainik Gomantak
Published on
Updated on

Woman murdered her live-in partner in Bengaluru, stabbed him to death:

बेंगळुरूमधील हुलिमावू येथे एका 34 वर्षीय महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडली आहे. मृत्यू झालेला व्यक्ती सातत्याने या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे महिलेने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी महिलेचे नाव रेणुका ( वय 34) असून ती कर्नाटकातील बेळगावीची आहे. आणि मृत जावेद (वय 29) हा केरळमधील कन्नूरचा आहे.

हे जोडपे गेल्या साडेतीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. यासाठी दोघे पेइंग गेस्ट, लॉज, सर्व्हिस अपार्टमेंट आणि भाड्याच्या घरासह विविध ठिकाणी राहत होते.

या जोडप्यामध्ये अनेकदा वाद होत होते, ज्यामुळे शेवटी त्यांच्यात गंभीर मतभेद झाले. मंगळवारी वाद वाढला आणि रागाच्या भरात रेणुका हिने जावेदच्या छातीत चाकू भोकसला.

Woman murdered her live-in partner
"स्त्रीच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठं काहीच नाही"; 12 वर्षांच्या मुलीला गर्भपातासाठी हायकोर्टाची परवानगी, नराधम बापाने केला होता बलात्कार

यानंतर आरोपी रेणुकाने आपल्या पार्टनरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर अपार्टमेंटमध्ये परतून ती पळून जाण्याचे नियोजन करत होती. मात्र, अपार्टमेंटमधील सुरक्षारक्षकाने दरवाजा बाहेरून बंद करून पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला अटक केली.

Woman murdered her live-in partner
मैत्रीच्या नात्याला काळीमा! धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने 19 वर्षांच्या शिक्षिकेवर दोघांकडून बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सहा वर्षांच्या मुलीची आई आहे. ती सतत वेगवेगळ्या पुरुषांसोबत पबमध्ये जायची. तसेच तिला लक्झरीयस जीवन हवे होते.

याप्रकरणी अपार्टमेंट मालक गणेश यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रेणुकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com