

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना सध्या नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगतदारपणे सुरू आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन दिग्गज संघ आज प्रतिष्ठेच्या विजेतेपदासाठी एकमेकांसमोर भिडले आहेत. या सामन्याला घरच्या प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण स्टेडियम “भारत, भारत!”च्या जयघोषाने दणाणून गेले असून, भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
महिलांच्या विश्वचषकाच्या इतिहासात हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण भारताने यापूर्वी अनेक वेळा अंतिम फेरी गाठली असली तरी विजेतेपदापासून संघ थोडा दूर राहिला होता. या वेळी मात्र घरच्या मैदानावर खेळताना संघाचा आत्मविश्वास उच्चांकावर पोहोचला आहे.
या रोमांचक सामन्यादरम्यान अनेक नामवंत व्यक्ती आणि बॉलिवूड तसेच क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटी देखील स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. प्रेक्षकांमध्ये भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा देखील दिसला.
त्याने आपल्या परिवारासोबत मैदानात उपस्थित राहून भारतीय महिला संघाला प्रोत्साहन दिले. रोहितच्या उपस्थितीने प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढला असून, त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रिंकू सिंग यांच्यासह काही सपोर्ट स्टाफ भारतीय महिला संघाचा अंतिम सामना पाहताना दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.