
IRCTC Ladakh Package Details: लेह-लडाखला भेट देणार्यांसाठी IRCTC ने खास पॅकेज आणले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्ही लेह, नुब्रा, पॅंगॉन्ग यासह अनेक अद्भुत ठिकाणांना भेट देऊ शकता. या पॅकेजची किंमतही खूपच कमी ठेवण्यात आली आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजला 'डिस्कव्हर लडाख' असे नाव दिले आहे. चला तर मग या पॅकेजविषयी जाणून घेऊया...
पॅकेज
आयआरसीटीसीने (IRCTC) या पॅकेजला 'डिस्कव्हर लडाख' असे नाव दिले आहे. या सहलीत नुब्रा, लेह, शाम व्हॅली, पॅंगॉन्ग, तुर्तुकला तुम्ही भेट देऊ शकता. ट्रिपमध्ये टोटल सीट 30 आहेत, ज्यामध्ये ट्रॅवलिंग मोड फ्लाइट आहे. पॅकेजमध्ये थ्री स्टार हॉटेल उपलब्ध असेल.
प्रवास कधी आणि कुठून सुरु होईल
ही ट्रीप याच महिन्यात निघणार आहे. ट्रीपच्या पुढील तारखा 24 आणि 26 सप्टेंबर आहेत. त्याची सुरुवात दिल्लीपासूनच (Delhi) होत आहे.
कुठून होणार ट्रीपची सुरुवात
या दौऱ्याचा बोर्डिंग पॉइंट दिल्ली आहे. ट्रीप 6 रात्री आणि 7 दिवसांची आहे. या पॅकेजमध्ये फ्लाइट, कॅब, हॉटेल, विमा सर्व काही आहे.
टूर पॅकेज
तुम्ही पॅकेज निवडू शकता. पॅकेजबद्दल बोलायचे झाल्यास, सिंगल ऑक्युपन्सी 38,900 रुपये आहे. सिंगल ऑक्युपेसी 33,700 रुपये आणि डबल ऑक्युपेसी 32,960 रुपये आहे. याशिवाय 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 27,650 रुपये आहे. तर 2 ते 11 वयोगटातील मुलासाठी 14,050 रुपये आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.