Sales Of Jockey, Rupa, Dollar Fall, Why Are Indians Turning Their Backs to Innerwear?
देशात इनरवेअर्सच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जॉकी, डॉलर आणि रुपा इनरवेअर्सच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईमुळे लोकांनी इनरवेअर्स खरेदी करणे बंद केले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. लोकांनी पुन्हा एकदा कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोक पार्टी वेअरपासून नॉर्मल आणि ऑफिस वेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे, शूज आणि सौंदर्य उत्पादने खरेदी करत आहेत. पण, इनरवेअर्सकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे जॉकी, डॉलर, रुपा या इनरवेअर्सच्या विक्रीत घट झाली आहे.
सणासुदीच्या काळात खरेदीसाठी फॅशनेबल कपड्यांची विक्री वाढली असली तरी इनरवेअर्सची विक्री मात्र घटलेली आहे.
भारतात महागाई इतकी वाढली आहे की लोकांनी इनरवेअर्स खरेदी करणे बंद केले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या तिमाहीत इनरवेअर्सचा वापर ५५ टक्क्यांनी कमी झाला आहे. तर आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीत, जॉकीच्या एकूण महसुलात 28% आणि व्हॉल्यूममध्ये वाढ 31% वाढ झाली आहे.
तिमाही दरम्यान, मॅक्रो हेडविंड आणि बाजारातील परिस्थितीने काही आव्हाने उभी केली. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत इनरवेअर्सच्या खरेदीत थोडीशी घट झाली. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात 7.5% घट नोंदवली आहे.
विक्रीत घट होण्याचे कारण वाढत्या महागाईमुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत हे देखील असू शकते. तसेच, भारतीय ऑनलाइन मार्केटिंगला अधिक महत्त्व देत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना ऑनलाइन स्टोअर्सवर जास्त सूट मिळत आहे.
त्याच वेळी, स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे की मल्टी ब्रँड आऊटलेट्स आधी जेवढा स्टॉक खरेदी करत होते तेवढा आता खरेदी करत नाहीत. ते जे खरेदी करत आहेत त्याचे पेमेंट देण्यासही विलंब होत आहे, त्यामुळे उत्पादकांच्या खेळत्या भांडवलावरही परिणाम होत आहे.
डिसेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत, जॉकी आणि लक्स इंडस्ट्रीजची मूळ कंपनी पेज इंडस्ट्रीजच्या विक्रीत घट दिसत आहे. तर, रुपा अँड कंपनीने व्हॉल्यूममध्ये 52 टक्के घट नोंदवली आहे.
गेल्या दीड वर्षात रुपाच्या शेअर्समध्ये ५२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. पेज इंडस्ट्रीजचे व्हॉल्यूम 11 टक्क्यांनी कमी झाले असून शेअर्सची किंमत पाच टक्क्यांनी कमी झाली आहे.
युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारतातील इनरवेअर मार्केट 48,123 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पुरुषांचा वाटा 39% आणि महिलांचा वाटा 61% आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.