Pranali Kodre
युजवेंद्र चहलला 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही.
असे असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चहलने इंग्लंडमधील काउंटी क्लब केंटशी करार केला आहे.
तो सध्या सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळणार आहे.
केंट संघाकडून खेळणार असल्याची माहिती चहलनेही दिली आहे. तसेच क्लबकडूनही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
चहलने म्हटले आहे की त्याच्यासाठी हे उत्साहवर्धक आव्हान आहे. तसेच तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.
या हंगामात केंटकडून सुरूवातीला आर्शदीप सिंगही खेळला होता.
अर्शदीपने जून-जुलैमध्ये या संघाकडून खेळताना 5 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, चहल मर्यादीत षटकांचे क्रिकेट सातत्याने खेळला असला, तरी तो प्रथम श्रेणी क्रिकेट फारसा खेळलेला नाही.
चहलने 33 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 87 विकेट्स घेतल्या आहेत.