Sameer Amunekar
क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. युझवेंद्र चहलनं धनश्रीसोबतचे सोशल मीडियावरीचे सगळे फोटो डिलीट केले आहेत.
युझवेंद्र आणि धनश्रीने घटस्फोट घेतला तर युजवेंद्रला धनश्रीना पोटगी म्हणून किती पैसे द्यावे लागतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
युझवेंद्र चहल भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू असून तो खूप पैसे कमावतो. त्याला आयपीएलमध्ये पंजाब संघाने 18 कोटींमध्ये खरेदी केलं आहे.
धनश्री ही प्रसिध्द कोरिओग्राफर आहे. तिचे डान्स व्हिडीओ यूट्युबवर चांगलेच व्हायरल होतात.
दोघांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली आहे. त्यामुळे त्या दोघांनी जर घटस्फोट घेतला तर धनश्रीना पोटगी म्हणून किती पैसे द्यावे लागतील? याबाबतचा निर्णय हा कोर्टावर अवलंबून आहे.
पतीच्या कमाईची किंवा एकूण संपत्तीच्या 25 टक्क्यांपर्यंत वाटा हा पत्नीला घटस्फोटानंतर दिला जातो. त्यामुळे धनश्रीने पोटगी मागितल्यास 25 टक्क्याच्या हिशोबानं चहलला 20 कोटींपर्यंत पोटगी द्यावी लागू शकते.