गोमन्तक डिजिटल टीम
भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे गोव्यात अलिशान घर आहे. युवराजचे हे घर आता सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
गोव्यातील मोरजी (Morjim, Goa) येथील निसर्गरम्य परिसरात 'कासा सिंग' हे युवराज सिंगचे अलिशान घर आहे.
युवराज सिंगच्या या घरातील इंटेरिअर अतिशय सुंदर आहे.
हिरवागार मोरजीचा टेकडी परिसर आणि समोर दिसणारा निळाशार अरबी समुद्र (Arabian Sea) युवराजच्या अलिशान घराला खऱ्याअर्थानं सिलेब्रिटी होम बनवतात.
युवराज सिंगने एअर बीएनबी (AIRBNB) सोबत एकत्र येत गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी या घरात राहाण्यासाठी एक खास ऑफर उपलब्ध करून दिली आहे.
'सहा जणांसाठी एकच मुक्काम' अशी या घराची ऑफर आहे. 14 ते 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भाग्यवान सहा जणांना युवराजच्या या घरात राहता येईल.
1,212 रुपये प्रति रात्र असा यासाठी दर निश्चित करण्यात आला आहे. 28 सप्टेंबरपासून http://airbnb.com/yuvrajsingh या लिंकवरून घरासाठी बुकिंग करता येईल.