Kavya Powar
आपलं गोवा राज्य निसर्गाने नटलेलं राज्य आहे.
इथल्या ग्रामीण भागात घरात लागणाऱ्या गोष्टी प्रामुख्याने कुळागरात पिकवल्या जातात.
मात्र गोव्यात शेती केली जाऊ शकत नाही असा अनेकांचा समज आहे.
पण याला भेद देत गोव्यातील वरद सामंत या तरुण शेतकऱ्याने इथे शेतीला सुरुवात केली.
त्याने आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोगही केले.
भाजीपाला, फळे, फुले तसेच विविध गोष्टींचे उत्पादन त्याने शेतीतून घेतले आहे.
त्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेही वरदचा सन्मान करण्यात आला आहे.
वरदची शेतजमीन खाणपट्ट्यात असूनही त्याने कलिंगडाचे भरघोस पीक घेतले.
यातून त्याने मोठ्या प्रमाणात नफाही मिळवला
भाजीपाला पिकवत त्याने गोव्यातही शेती केली जाऊ शकते हे सिद्ध केले आहे.
गोव्यातील तसेच संपूर्ण देशातील तरुणांसाठी तो एक प्रेरणा बनला आहे.