Shreya Dewalkar
अरबी समुद्र आणि भारतीय उपखंडाच्या मध्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच
ऑफ शोर टर्फस् यामुळे राज्यात तब्बल 22 दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी तुरळक व मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सासष्टी, केपे, सांगे, तिसवाडी तसेच मुरगाव तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘अल निनो’च्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात दडी मारली होती.
मॉन्सूनची ही स्थिती भारतीय उपखंडाला त्रासदायक ठरणार आहे.
शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये केवळ ३० ते ३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे शेतीला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.