Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने सर्वात प्रथम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली वनडे वर्ल्डकप जिंकला होता.
या विश्वविजेतेपदाचे अनेक हिरो ठरले, यातील एक होते 11 ऑगस्ट 1954 रोजी लुधियानामध्ये जन्मलेले यशपाल शर्मा.
यशपाल यांनी 1983 वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध 89 धावांची खेळी केली होती. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती.
याशिवाय सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 61 धावांची खेळी केली होती. या वर्ल्डकपमध्ये त्यांनी कपिल देव (303) यांच्यापाठोपाठ सर्वाधिक 240 धावा केल्या होत्या.
यशपाल शर्मा यांनी 1978 ते 1985 या कालावधीत 37 कसोटी सामने आणि 42 वनडे सामने खेळले.
त्यांनी 37 कसोटीत 2 शतकांसह 1606 धावा केल्या. तसेच 42 वनडेत 4 अर्धशतकांसह 883 धावा केल्या.
यशपाल शर्मा हे 42 वनडेतील 40 डावात फलंदाजी करताना कधीही शुन्यावर बाद झाले नाहीत.
यशपाल शर्मा यांचे 13 जुलै 2021 रोजी निधन झाले.