Pranali Kodre
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ते 16 जुलै दरम्यान डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे.
21 वर्षीय यशस्वी जयस्वालचा पहिलाच कसोटी सामना असून त्याने शतक साजरे केले. त्याने 215 चेंडूत त्याचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले.
जयस्वाल भारताबाहेर कसोटी पदार्पणात करताना शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे, तर एकूण सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्यापूर्वी असा कारनामा करणाऱ्या सहा क्रिकेटपटूंबद्दल नजर टाकू.
अब्बास अली बेग यांनी मॅचेस्टर येथे इंग्लड विरुद्ध 1959 मध्ये पदार्पणाचा सामना खेळताना 112 धावांची खेळी केली होती.
सुरिंदर अमरनाथ यांनी न्यूझीलंडविरुद्ध 1976 साली ऑकलंडला कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 124 धावांची खेळी केली होती.
प्रविण आमरे यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे 1992 मध्ये कसोटी पदार्पण करताना 103 धावांची खेळी केली होती.
सौरव गांगुलीने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर 1996 साली कसोटी पदार्पण करतान 131 धावांची खेळी केली होती.
विरेंद्र सहेवागने 2001 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफॉन्टेन येथे कसोटी पदार्पण करताना 105 धावांची खेळी केली होती.
सुरेश रैनाने 2010 साली श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे कसोटी पदार्पणाचा सामना खेळताना 120 धावांची खेळी केली होती.