IPL 2025: जयस्वालचा 'यशस्वी' रेकॉर्ड! विराट-रोहित बघतच राहिले

Manish Jadhav

आयपीएल 2025

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak

यशस्वी जयस्वाल

मात्र, राजस्थानचा संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आपला जलवा दाखवून देत आहे. गेल्या चार डावांमध्ये त्याने तीन वेळा 50 चा टप्पा ओलांडला. गुरुवारी (24 एप्रिल) राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak

सर्वाधिक षटकार

यशस्वी आता यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्ले दरम्यान सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने आतापर्यंत 15 षटकार लगावले. पंजाबचा प्रियांश आर्य अव्वल स्थानी असून यशस्वी दुसऱ्या स्थानी पोहोचला. विराट-रोहितला अशी कामगिरी अजून जमली नाही.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak

शानदार खेळी

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात यशस्वीने 49 धावांची खेळी खेळली, परंतु त्याचे अर्धशतक एका धावसंख्येने हुकले.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak

तीन अर्धशतके

पण याआधी यशस्वीने सलग तीन सामन्यात तीन अर्धशतके झळकावली.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak

वादळी खेळी

यशस्वीने एलएसजीविरुद्ध 74, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 51 आणि आरसीबीविरुद्धच्या मागील सामन्यातही 75 धावांची वादळी खेळी खेळली होती.

yashasvi jaiswal | Dainik Gomantak
आणखी बघा