Pramod Yadav
गोव्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय नौसेना आणि नौदल मैदानात उतरले आहे.
गोव्यातील मागील सहा दिवसांपासून इतिहासातील सर्वात मोठी सुरू आहे. यामुळे राज्यातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
म्हादई अभयारण्यात शनिवारपासून आग धुमसत असून साट्रे, देरोडे, अनमोड घाट, शिगाव-काले, पोट्रे-नेत्रावळी, कारेमळ-काले, धारबांदोडा याठिकाणी आग सुरूच आहे.
भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या वतीने हजारो लिटर पाणी ओतून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
आगीमुळे म्हादई अभयारण्याची अपरिमित हानी झाली असून सुमारे 400 पेक्षा जास्त हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.
राज्यभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 797 जवान तैनात केले आहेत, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली.
जवळपास 50 कर्मचारी मोलेजवळील दुर्गम भागात तैनात केले आहेत.
गुरुवारी राज्यभर 28 आगीच्या दुर्घटना नोंदवल्या. यात झारीवाडा, साखळी, बर्नुदे-कुंकळ्ळी, बोरी तसेच दूधसागर, नगर्से, काणकोण यांचा समावेश आहे.
राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आग परिस्थितीची हवाई पाहणी केली. जाणूनबुजून कोणी आग लावताना आढळ्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे गोवा सरकारने म्हटले आहे.