Akshay Nirmale
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी योगासने केली.
राजभवनात झालेल्या या योग कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डीही सहभागी झाले. यावेळी जी-२० परिषदेतील मंत्र्यांनीही योग प्रात्यक्षिके केली.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही उस्फुर्तपणे सहभाग घेत योगासने केली.
महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे हे देखील योगा दिन महोत्सवात रमले.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी योग प्रात्यक्षिके केली.
गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला.
गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.