Priyanka Deshmukh
मुंबई बॉलिवूडसाठी प्रसिद्ध आहे, ती भारताची व्यावसायिक राजधानी आहे, परंतु मुंबई वडा पाव साठी देखील प्रसिद्ध आहे.
वडापाव हे फक्त रस्त्यावरचे फुड नसून मुंबईकरांची एक भावना आहे
सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा सम्राट वडापाव विले पार्ले येथे मिळतो.
लक्ष्मण वडापाव – घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी प्रसिद्ध आहे.
भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. मुंबईच्या वाल्मिकी नगर परिसरात हा वडापाव मिळतो.
कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला कुंजविहारचा वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.
विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.
ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. गेल्या 18 वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.
गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते.
प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या 35 वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे.
मुंबईतील वडा पाव हा ताजा आणि 24 तास उपलब्ध असतो. सेलिब्रिटींनी वडा पावला सर्वोत्तम फास्ट फूड म्हणून प्रोत्साहन दिले आहे.
स्ट्रीट स्टॉल्स आणि फास्ट फूड जॉइंट्समध्ये किंमत 10 ते 20 रुपयांपर्यंत आहे.