Kavya Powar
आजच्या काळात आपल्यापैकी अनेकजण मानसिक तणावाने त्रस्त आहेत.
तुम्हीही जर या त्रासाने हैराण असाल तर काही सोप्या गोष्टींचा अवलंब करून यातून तुमची सुटका होऊ शकते
तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल तुमच्या जवळच्या मित्रांशी बोलत रहा. बोलल्याने तुमचा ताण कमी होईल
आपला ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन हा एक प्रभावी मार्ग आहे
ठिकाण बदलासाठी कुठेतरी फिरून या. यामुळे तुम्ही फ्रेश व्हाल
मनात चाललेला गोंधळ लिहून काढा. यामुळे तुमचा स्ट्रेस खूप प्रमाणात कमी होईल
पुस्तके वाचायची सवय असल्यास उत्तम. यामुळे तुम्ही काही काळासाठी वेगळ्याच जगात जाता. ताणतणावाचे विचार यामुळे कमी होतील
काही केल्या तुमचा स्ट्रेस कमी होत नसेल तर वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या