Pranali Kodre
भारतीय क्रिकेट इतिहासात 25 जून हा दिवस खूपच खास आहे. कारण याच दिवशी 40 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 1983 वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
पण, त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये एवढा पैसा नव्हता की खेळाडूंना लाखो रुपये दिले जातील.
सध्या 1983 साली खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाच्या पेस्लीपचा फोटो व्हायरल होत आहे.
त्यानुसार 1983 साला दरम्यान भारतीय खेळाडूंना एका वनडे सामन्यासाठी मॅच फी म्हणून 1500 रुपये मिळायचे.
तसेच दैनिक भत्ता म्हणून 200 रुपये मिळायचे.
दरम्यान, वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर विजेतेपदाचे बक्षीस म्हणून भारतीय संघाला साधारण 9 लाख 93 हजार रुपये मिळाले होते.
मात्र, भारतात संघ परत आल्यानंतर बीसीसीआयकडे खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते.
त्यामुळे, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कॉन्सर्टमधून 20 लाख रुपये जमा करण्यात आले, त्यानंतर प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये देण्यात आले होते.