Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारी 2023 पासून महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे.
साल 2009 पासून सुरु झालेल्या महिला टी20 वर्ल्डकपचे यंदाचे आठवे पर्व आहे.
आत्तापर्यंत खेळवण्यात आलेल्या महिला टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा ऑस्ट्रेलियन महिला संघाने विजेतेपद नावावर केले आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने 5 वेळा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 या वर्षी झालेले टी20 वर्ल्डकप जिंकले आहेत.
तसेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिज महिला संघांनी प्रत्येकी एक वेळा टी20 वर्ल्डकप नावावर केला आहे.
इंग्लंडने सर्वात पहिला 2009 साली झालेला महिला टी20 वर्ल्डकप जिंकला होता.
वेस्ट इंडिज महिला संघाने 2016 साली झालेला टी20 वर्ल्डकप जिंकला होता.
त्यामुळे आत्तापर्यंत केवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज महिला संघांनाच टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा करता आला आहे.