WPL 2023 मधील हे नियम माहिती आहेत का?

Pranali Kodre

महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे.

WPL 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

या डब्ल्यूपीएलमध्ये काही नवीन नियम पाहायला मिळाले आहेत.

WPL 2023 Captains | Dainik Gomantak

या डब्ल्यूपीएल हंगामात 20 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत.त्यानंतर एलिमिनेटर आणि फायनल असे 2 प्लेऑफ सामने होतील.साखळी फेरीत प्रत्येक संघ ८ सामने खेळणार आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे.तसेच सुपर ओव्हरदेखील बरोबरीत सुटली, तर पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.

WPL 2023 | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलच्या एका सामन्यासाठी एकूण 4 स्ट्रॅटर्जिक टाईम-आऊट असणार आहेत. म्हणजे एका डावात दोन टाईम-आऊट होतील. यातील क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 ते 9 षटकांदरम्यान, तर फलंदाजी करणारा संघ 13 ते 16 षटकांदरम्यान टाईम-आऊट घेऊ शकतो.

WPL 2023 | Dainik Gomantak

प्रत्येक संघाला एका सामन्यात दोन डिआरएस घेता येणार आहेत. तसेच डब्ल्यूपीएलमध्ये केवळ खेळाडू बाद की नाबाद यासाठीच नाही, तर नो-बॉल आणि वाईड चेंडू तपासण्यासाठीही खेळाडू डीआरएस घेऊ शकतात.

WPL 2023 | Dainik Gomantak

विकेट पडल्यानंतर जर पुढील फलंदाज 90 सेंकदच्या आधी मैदानात आली नाही, तर तिच्यावर दंडात्मक कारवाई होईल.

WPL 2023 | Dainik Gomantak

तसेच एखाद्या खेळाडूला सामन्यात चेंडू लागून दुखापत झाल्यास कन्कशन सब्स्टिट्यूटचा वापर करता येऊ शकतो.

WPL 2023 | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. पण या नियमाला एक अपवाद असा आहे की आयसीसी सहसदस्य देशांमधील एका खेळाडूला पाचवा परदेशी खेळाडू म्हणून खेळवले जाऊ शकते. दरम्यान, केवळ दिल्ली कॅपिटल्समध्ये सहसदस्य देशातील एक खेळाडू आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमध्ये साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांकावरील संघ थेट फायनलसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटरचा सामना खेळतील. एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ फायनलसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरेल.

WPL 2023 | Dainik Gomantak

दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र,डब्ल्यूपीएलमध्ये हा नियम सध्या लागू करण्यात आलेला नाही.

WPL 2023 | Dainik Gomantak
Amelia Kerr | Dainik Gomantak