दैनिक गोमन्तक
सध्या महिला अत्याचारची प्रकरणं खूप वाढली आहेत. महिलांना कामासाठी घराबाहेर पडणे आणि एकटीने प्रवास करण्याची भीती वाटू लागली आहे.
घाबरुन न जाता यासगळ्याशी लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी महिलांनी ठेवायला हवी.
तुम्हाला अशा काही सेफ्टी टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला परिस्थितीशी लढता येईल.
तुम्ही प्रायवेट कॅब बुक केली तरी नेहमी मोबाईल जवळ ठेवा, तुमच्या मार्गांवर लक्ष ठेवा आणि मॅप तुमच्याकडे खुला ठेवा.
कॅबमध्ये झोपणे अजिबात सुरक्षित नाही, म्हणून शुद्धीवर राहा.
कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहा किंवा त्यांना सतत सांगा की तुम्ही कुठे पोहोचला आहात.
सुरक्षेसाठी महिलेजवळ हेल्पलाइन आणि पोलिस क्रमांक असणे अत्यंत गरजेचे आहे.
आवश्यक आणि आपत्कालीन क्रमांक स्पीड डायलवर ठेवा.
पेपर स्प्रे आणि धारदार गोष्टी सोबत ठेवा.
एकट्याने जाताना निर्जन रस्त्यावर जाणे टाळावे.
ऑफिसमध्ये शक्यतो रात्रीची शिफ्ट टाळण्याचा प्रयत्न करा.