Akshay Nirmale
मंदिरांमध्ये देवीदेवतांची पुजा, प्रार्थना करण्याचा अधिकार केवळ पुरूषांना आहे, या समजाला छेत देत एका राज्याने आता महिलांनाही पुजेचा अधिकार देऊ केला आहे.
तामिळनाडू राज्य सरकारने तीन महिलांची पुजारी म्हणून नियुक्ती केली आहे.
एस. कृष्णावेण्णी, एस. राम्या आणि रंजिता अशी या महिला पुजाऱ्यांची नावे आहेत.
पैकी एस. राम्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर कृष्णावेण्णी आणि रंजिता बी.एस्सी. झाल्या आहेत.
तामिळनाडुतील वैष्णव मंदिरात या तिघी महिलांची सहाय्यक पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या तिघी महिलांनी पुजारी पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
श्रीरंगम येथील श्री रंगनाथर मंदिराद्वारे हा अभ्यासक्रम चालवला जातो.