Sameer Panditrao
राज्यात थंडीचा जोर वाढला असून ऋतूमान बदलांमुळे सर्दी, खोकला, ओढ फुटणे आणि त्वचेचा कोरडेपणा यासारख्या समस्या जाणवतात.
हिवाळ्यात जठराग्नी वाढतो, त्यामुळे भूक वाढते. या काळात खजूर, तीळ, शेंगदाणे, आले, लसूण, रताळे, बीट यासारख्या पोषणमूल्यांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
हिवाळ्यात त्वचा रुक्ष होते, त्यामुळे स्निग्ध पदार्थ जसे की तूप, शेंगदाण्याचे तेल किंवा मेवाचे सेवन केल्याने त्वचा मृदू राहते.
थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे, हातमोजे, पायमोजे, कानटोपी, शाल आणि स्वेटर यांचा वापर करा.
हिवाळ्यात आरोग्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
थंड हवामानात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. तरीही त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात धुके आणि दव यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य कपड्यांचा वापर करून आपले आरोग्य सांभाळा.