Sameer Amunekar
थंड हवेत त्वचा कोरडी पडते, त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ चांगल्या दर्जाच्या मॉइश्चरायझरचा वापर करा.
जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, त्यामुळे त्वचा कोरडी होते.
थंडीत तहान कमी लागते, पण शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवणे त्वचेसाठी आवश्यक असते.
ओठ आणि हात हे सर्वात आधी कोरडे पडतात. त्यामुळे ओठांसाठी लिप बाम आणि हातांसाठी हायड्रेटिंग क्रीम वापरा.
घरातील वातावरण गरम ठेवा, खिडक्या बंद ठेवाव्या. म्हणजे घरात थंड हवा येत नाही.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन ई आणि सी युक्त फळे व भाज्या खाल्ल्याने त्वचा आतूनही पोषित राहते.
थंडीच्या दिवसातही सूर्याची किरणं त्वचेवर परिणाम करतात, त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन नक्की वापरा.