Kavya Powar
हिवाळा सुरू होताच सगळ्यात आधी ओठ फुटायला लागतात
त्यासाठी दररोज घरगुती उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे
ओठांना दररोज मध लावल्याने ओठ मऊ राहतात
रोज रात्री झोपताना ओठांना खोबरेल तेल लावा यामुळे ओठांचा काळसरपणाही कमी होईल आणि ओठ मऊ होतील
दुधावरील साय ओठांना लावल्याने कोरडेपणा दूर होतो
घरातून बाहेर पडताना लिप बाम लावणे विसरू नका
देशी तूप लावल्यानेही हिवाळ्यात कोरड्या ओठांपासून सुटका होते