दैनिक गोमन्तक
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने वेदना तर होतातच पण सोबतच टाचही वाईट दिसतात.
थंडीत आपल्या टाचांना नियमित घासावे, त्यामुळे टाचांच्या आत जाणारी धूळ निघून जाते.
त्याचप्रमाणे टाचांना स्क्रब करणे देखील आवश्यक आहे, त्यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरु शकता.
भेगा पडलेल्या टाचांवर मेण आणि त्यात तेल टाकून रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा.
2-3 चमचे तांदळाच्या पिठात 1 चमचा मध आणि 3-4 थेंब सफरचंदचे व्हिनेगर घालून भेगा पडलेल्या टाचांवर लावा.
तुमची टाच खूप कोरडी असेल तर तांदळाच्या पेस्टमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि बदाम तेल टाकून लावा.
टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी 1 चमचा कच्ची हळद, 2 चमचे तूप आणि 1 चमचा मेण यांची पेस्ट गरमकरुन लावावी.
मेणबत्तीत मोहरीचे तेल घालून ते थंड करुन टाचांवर लावल्याने टाचांच्या भेगा पडण्याची समस्या दूर होते.
रोज झोपण्यापूर्वी टाचांना स्वच्छ साफ करुन व्हॅसलीन लावून त्यावर कॅरीबॅग टाकून मोजे घालून झोपा.
दिवसातून एकदा तरी पाय गरम पाण्यात ठेवावे आणि नंतर स्वच्छ घासून त्यावर हलके गरम केलेले खोबरेल तेल लावा.